मध्य आफ्रिका प्रजासत्ताक
मध्य आफ्रिका प्रजासत्ताक : आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेला एक स्वतंत्र देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २० १६’ उ. ते ११० २०’ उ. व १४० २०’ पू. ते २७० ४५’ पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ ६,२४,९७७ चौ. किमी. लोकसंख्या २४,८०,००० (१९८२). हा देश भूवेष्टित असून त्याच्या उत्तरेस चॅड, पश्चिमेस कॅमेरून, दक्षिणेस काँगो प्रजासत्ताक (ब्रॅझाव्हिल) व झाईरे (काँगो लोकसत्ताक गणतंत्र) आणि पूर्वेस सूदान हे देश आहेत.